पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; आता पेट्रोल...

पीटीआय
रविवार, 5 जानेवारी 2020

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे तेल कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली.

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे तेल कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. एक जानेवारीला इंधन दर स्थिर होते, मात्र गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी दरात वाढ झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बगदादच्या हवाईतळावर अमेरिकी सैनिकांनी क्षेपणास्त्राचा मारा केल्याने इराणाचे कमांडर कासिम सुलेमानी ठार झाले. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्यास सुरवात झाली. दिल्लीत एक लीटर पेट्रोलच्या किमतीत दहा पैसे, तर कोलकता, मुंबई आणि चेन्नई येथे नऊ पैसे प्रतिलिटर वाढ झाली आहे. याप्रमाणे पेट्रोलचा रविवारी भाव नवी दिल्लीत 75.54 रुपये, कोलकता येथे 78.13 रुपये, मुंबईत 81.13 रुपये चेन्नईत 78.48 रुपये प्रतिलिटर भाव राहिला.

पुण्याच्या जावयाला मिळाली गृहमंत्रिपदाची जबाबदारी, पाहा कोण?

त्याचवेळी दिल्ली आणि कोलकता येथे डिझेलच्या दरात लिटरमागे 11 पैशांनी, तर मुंबईत 12 पैशांनी वाढ झाली आहे. चेन्नईतही 11 पैशाने डिझेलचा भाव वधारला आहे. मुंबईत डिझेलसाठी लिटरमागे 71.84 रुपये मोजावे लागत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol and diesel prices hiked again