पेट्रोलच्या शतकाला अवघ्या चार धावा कमी; सलग 9 व्या दिवशी देशात इंधन दरवाढ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 February 2021

सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग नवव्या दिवशी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग नवव्या दिवशी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. यावेळच्या वाढींना वेगळं महत्त्व आहे कारण या वाढीसह प्रत्येकवेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवा उच्चांक गाठत आहेत. आज देखील डिझेलच्या किंमतीमध्ये 24 ते 26 पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या किंमतींमध्ये 23 ते 25 पैशांनी वाढ झाली आहे. 

हेही वाचा - किरण बेदी यांना पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून हटवलं

दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती आतापर्यंतच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचल्या आहेत. यासोबतच दिल्लीमधील पेट्रोलचे भाव 89.54 रुपये प्रति लिटर झाले आहेत तर मुंबईमध्ये पेट्रोल 96 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. पेट्रोलची शंभरी गाठायला अवघे 4 रुपये बाकी आहे. 

प्रमुख शहरांमध्ये काय आहे किंमत?  

शहर             डिझेल    पेट्रोल
दिल्ली            79.95    89.54
कोलकाता       83.54    90.78
मुंबई              86.98    96.00
चेन्नई              85.01    91.68

दररोज सहा वाजता बदलतात किंमती
दररोज सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नवे दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर अनेक गोष्टी जोडल्या गेल्यानंतर जवळपास त्यांचे भाव दुप्पट होतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol and diesel prices increase 17 February 2021