
- आप' नगरसेवकाच्या घराच्या छतावर पेट्रोल बॉम्ब, गावठी कट्टे आढळले आहेत.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. यामध्ये 34 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले. या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आता 'आप' नगरसेवकाच्या घराच्या छतावर पेट्रोल बॉम्ब, गावठी कट्टे आढळले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दिल्लीतील खजुरी येथील नगरसेवक ताहिर हुसैन यांच्या घराच्या छतावर आढळले आहे. त्यामुळे दिल्ली हिंसाचारात त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घराच्या छतावर पेट्रोल बॉम्ब, गावठी कट्टे, गलोल आणि एका ट्रेमध्ये मोठे दगड आढळून आले आहेत. या घरावरुन सातत्याने दगड आणि पेट्रोल बॉम्ब फेकले जात होते.
माध्यमांचे प्रतिनिधी गेल्यानंतर आले समोर
या छतावर दगड आणि काही दगडांचा भुगाही होता आणि विटा फोडून त्याचे छोटे-छोटे तुकडे करण्यात आले आहेत. या सर्व गोष्टी माध्यमांचे प्रतिनिधी फिरत असताना समोर आले आहे.