

Inflation Shock: Rising Fuel and Food Prices Increase Burden on Households
esakal
नवी दिल्ली: पश्चिम आशियातील संघर्षामुळे इंधनाच्या किमती वाढल्या असून घाऊक किंमत आधारित महागाई ४२ महिन्यांच्या उच्चांकावर, म्हणजेच ८.३ टक्क्यांवर पोहोचली आहे. मार्चमध्ये हा दर ३.८८ टक्के एवढा होता, तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तो ०.८५ टक्क्यांवर पोचला. जागतिकस्तरावर तेलाच्या किमती भडकल्यामुळे महागाई वाढल्याचे दिसते. उद्योग मंत्रालयाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.