सरकारच्या चार वर्षपूर्तीनिमित्त इंधन दरवाढीचा 'तेरावा' 

वृत्तसंस्था
शनिवार, 26 मे 2018

निती आयोगाने सर्व राज्यांनी इंधनावरील करात कपात करावी, अशी सूचना केली असतानाही इंधऩ दरवाढ सुरुच आहे. आज झालेल्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 85.78 आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 73.36 रुपये इतके झाले आहेत. 

नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज (शनिवार) चार वर्ष पूर्ण झाली असून, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ आज सलग तेराव्या दिवशी सुरूच राहिली. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 13 पैसे; तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 16 पैसे वाढ झाली. 

निती आयोगाने सर्व राज्यांनी इंधनावरील करात कपात करावी, अशी सूचना केली असतानाही इंधऩ दरवाढ सुरुच आहे. आज झालेल्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 85.78 आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 73.36 रुपये इतके झाले आहेत. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावात वाढ झाल्याने सलग तेरा दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. त्याआधी कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात इंधन दरवाढ रोखण्यात आली होती. या काळात झालेला तोटा भरून काढण्यासाठी तेल कंपन्यांकडून दरवाढ सुरू आहे. यातच डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने खनिज तेलाच्या आयातीचा खर्च वाढत आहे. यामुळे पर्यायाने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. 

Web Title: petrol diesel price hike on continues last thirteen days