

Petrol diesel price hike
esakal
Petrol diesel latest news : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याने जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधन (एटीएफ) निर्यातीवरील अतिरिक्त नफ्यावर कर प्रति लिटर ७ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाचा देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.