

Iran US Conflict Hormuz Strait Closure
esakal
Strait of Hormuz : पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्ध होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत असलेला तणाव आता थेट लष्करी संघर्षात परिवर्तित होताना दिसत आहे. इराणने जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री व्यापारमार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुढील आदेशापर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर काही तासांतच अमेरिकेने इराणमधील अनेक लष्करी आणि रणनीतिक ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचा दावा करण्यात आला आहे. या घडामोडींमुळे जागतिक तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यावर मोठे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.