पेट्रोलच्या दरात 1.39 तर डिझेलच्या दरात 1.04 रुपयांची वाढ

वृत्तसंस्था
रविवार, 16 एप्रिल 2017

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर प्रती लिटर 1.39 रुपये तर डिझेलचे दर प्रती लिटर 1.04 रुपयांनी वाढले आहे. हे दर आजपासून लागू झाले आहेत.

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर प्रती लिटर 1.39 रुपये तर डिझेलचे दर प्रती लिटर 1.04 रुपयांनी वाढले आहे. हे दर आजपासून लागू झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने एक एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. मात्र आता पुन्हा दरात वाढ झाली आहे. एक एप्रिलला पेट्रोलचे दर 4.85 रुपये प्रती लिटर तर डिझेलचे दर 3.41 रुपये प्रती लिटरने कमी झाले होते. देशात लवकरच पेट्रोलचे दर दररोज बदलणार आहेत. सुरुवातीला पुद्दुचेरी, विशाखापट्टणम, उदयपूर, मशेदपूर आणि चंदिगड या पाच शहरात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतील.

Web Title: Petrol Price Hiked By Rs. 1.39 Per Litre, Diesel By Rs. 1.04 Per Litre