भारतात सीरमपूर्वी Pfizer India ची लस येणार? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

pfizer india
pfizer india

corona vaccine updates करोना प्रतिबंधक लस निर्मिती यशस्वीरीत्या  करण्यासाठी  कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. भारतामध्ये सीरम  सीरम इन्स्टिट्युटच्याही अगोदर फायझर इंडियाची लस मिळण्याची शक्यता आहे. फायझर इंडियाने  (Pfizer India) लशीच्या तात्काल वापरासाठी (इमर्जन्सी अप्रुवल) राष्ट्रीय औषध नियंत्रण प्राधिकरण (DCGI) कडे अर्ज दाखल केला आहे.

भारतामध्ये मंजुरीसाठी अर्ज दाखल करणारी ही पहिलीच कंपनी आहे. या कंपनीच्या पॅरेंट कंपनीला यूनाइटेड किंगडम आणि बहरीनमध्ये मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भारतात फायझरला सर्वात प्रथम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. 

तात्काळ मंजुरी (इमर्जन्सी यूज अथॅरायझेशन) म्हणजे नेमंक काय?
लस आणि औषधांच्या वापराला परवानगी देण्यासाठी भारतामध्ये सेंट्रल ड्रग्‍स स्‍टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) रेग्युलेटरी बॉडी आहे. सेफ्टी आणि औषधाचा परिणाम याच्या अकलनावरुन कोणत्याही औषध वापराची परवानगी दिली जाते.  क्लिनिकल ट्रायल्‍सच्या आधारावर औषध वापराला तात्काळ मंजुरी दिली जाते. आतापर्यंतचा सर्वात कमी अप्रुवल वेळ हा साडे चार वर्ष इतक्या कालावधीचा होता. औषध उपयुक्त ठरत असेल तर त्याला फायनली अप्रुवल दिले जाते.

भारतामध्ये फायझरची चाचणी झालीच नाही 
फायझर इंडियाने  4 डिसेंबरला तात्काळ मंजुरीसाठी अर्ज केला आहे. जर्मन फार्मा कंपनी असलेल्या बायोएनटेकच्या मदतीने फायझर इंडिया लस निर्माण करत आहे. लशीचा कोडनेम BNT162b2 असा आहे. लस 95 परिणामकार असल्याचा दावा करण्यात आला असला तरी ही या लशीचे भारतात ट्रायल झालेल नाही.  

फायझरचे सीईओ नेमकं काय म्हणाले

फायझर लशीला मंजुरी मिळावी, यासाठी कंपनी प्रयत्नशील असताना कंपनीचे सीईओ डॉ. अल्बर्ट बूर्ला यांनी मोठ वक्तव्य केले आहे. लस टोचल्यानंतर संक्रमण होणार नाही याची खात्री देता येत नाही. यासाठी चाचणी आवश्यक आहे, असे ते म्हणाले आहेत. 

भारतात कोण कोणत्या लशीच्या ट्रायल सुरु आहेत  
सीरम इंस्टिट्यूटशिवाय देशात अन्य कंपनीच्या लशीचे क्लिनिकल ट्रायल सुरु आहेत. भारत बायोटेक आणि इंडियन काउंसिल ऑफ रिसर्च (ICMR) संयुक्तपणे तयार करत असलेली Covaxin तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. याशिवाय जायडस कॅडिलाची  ZyCov-D देखील सकारात्मक ट्रायल फेजमध्ये आहे. रशियात निर्माण करण्यात आलेल्या  Sputnik V ची ट्रायल देखील भारतात सुरु आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com