
लहानग्यांच्या लसीची प्रतिक्षा संपली; अमेरिकेत 8 नोव्हेंबरपासून लसीकरण
कोरोनाचा हाहाकार जगभरात आजही कायम आहे. एकीकडे या कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये वयस्कर लोकांसाठी लसीकरमाची मोहिम सुरु आहे तर दुसरीकडे लहान मुलांच्या लसीकरणाची तयारी देखील सुरु आहे. याचसंदर्भातील एक खुशखबर सध्या समोर आली आहे. अमेरिकेमध्ये आता 5 ते 11 वर्षे वयाच्या लहान मुलांना फायझर कंपनीची (Pfizer's Covid-19) लस दिली जाणार आहे. अमेरिकेच्या या यशस्वितेबाबत बोलताना राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय की, आपल्यासाठी हा एक टर्निंग पॉईंट आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून लहान मुलांच्या लसीची वाट पाहणाऱ्यांची मनोकामना आता पूर्ण होणार आहे.
हेही वाचा: चीनच्या उलट्या बोंबा, कोरोना पसरवण्यासाठी 'हे' 3 देश जबाबदार
लहान मुलांच्या माध्यमातून पसरणाऱ्या संसर्गाची शक्यता नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न या पावलामुळे साध्य होईल. लहान मुलांची सुरक्षा ही आमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. 29 ऑक्टोबर रोजीच अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने यास मंजूरी दिली होती. त्यानंतर आता सरकारकडून देखील लहान मुलांच्या लसीकरणाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
हेही वाचा: पोटनिवडणुकीच्या निकालाचा भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांना झटका
29 ऑक्टोबरला मंजूरी
29 ऑक्टोबरला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने लहान मुलांवरील फायझरच्या लसीला मान्यता दिली होती. लहान मुलांसाठी 10 मायक्रोग्रॅम डोस तर 12 वर्षांवरील मुलांसाठी 30 मायक्रोग्रॅमचा डोस निश्चित करण्यात आला आहे.
यूएईमध्ये देखील मिळाली मंजूरी
अमेरिकेनंतर आता संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएईने देखील तिथल्या 5 ते 11 वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी फायझरच्या कोरोना लसीला मान्यता दिली आहे. यूएईमध्ये 12 वर्षांवरील अधिक वयोगटातील मुलांसाठी फायझरच्या लसीला याआधीच मान्यता मिळाली आहे.
Web Title: Pfizer Covid19 Vaccine For Children Ages 5 To 11 From 8 November
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..