चीनच्या उलट्या बोंबा, कोरोना पसरवण्यासाठी 'हे' 3 देश जबाबदार

china corona
china coronaesakal

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरस (coronavirus) पसरवल्याचा आरोप असलेला चीन (china) आता या साथीसाठी इतर ३ देशांना जबाबदार धरत आहे. या पार्श्वभूमीवर चीनचा सरकारी मीडिया पुन्हा एकदा खोटेपणा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. चिनी अजेंडा पसरवणाऱ्या एका संशोधकाने ही माहिती दिली आहे. कोणते आहेत ते देश?

चीनच्या उलट्या बोंबा, कोरोना पसरवण्यासाठी 'हे' 3 देश जबाबदार

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चीनमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे चीनमध्ये सध्या कडक निर्बंध लादले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार चिनी प्रशासनाने लोकांना घरातील आवश्यक वस्तू जमा करून ठेवण्यास सांगितलं आहे. अशातच जगभरात कोरोना व्हायरस पसरवल्याचा आरोप असलेला चीन आता या साथीसाठी इतर देशांना जबाबदार धरत आहे.

china corona
"चीनची ही मोठी चूक!" जो बायडन यांनी चीनला का झापलं?

कोरोना विषाणूचे सर्वात मोठे कारण म्हणजे.....

चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेत हा विषाणू तयार करण्यात आल्याचा दावा अनेक वैज्ञानिकांनी केला आहे. तर काही देशांनी आतापर्यंत हे बायो वेपन असल्याचे सांगितले आहे. मात्र चीनने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. चिनी अजेंडा पसरवणाऱ्या एका संशोधकाने ही माहिती दिली की, चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी ब्राझीलचे गोमांस, सौदी अरेबियाची कोळंबी आणि अमेरिकेचे मेन लॉबस्टर (Maine Lobsters Theory) यांना कोरोना संसर्गासाठी जबाबदार धरलं आहे. आंतरराष्ट्रीय थिंक टँक पॉलिसी रिसर्च ग्रुप (POREG) साठी लिहिणारे संशोधक मार्सेल स्लेब्स यांनी “चीन समर्थक अजेंडा असलेली” शेकडो खाती ओळखली आहेत. ज्यामध्ये निर्यात केलेल्या मांसामुळे कोरोना विषाणू पसरत असल्याचे म्हटलं आहे.’ हा अहवाल अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, चीनचा दावा आहे की अमेरिकेची मेन लॉबस्टर थिअरी ही वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचे सर्वात मोठे कारण आहे. या खोट्या गोष्टी पसरवण्यासाठी चीनचे राजदूत पूर्ण सहकार्य करत आहेत. विशेष म्हणजे, 2019 च्या शेवटी चीनमध्ये कोरोनाचं पहिलं प्रकरण समोर आलं. पण चीनने इतर कोणत्याही देशाला वेळेत माहिती दिली नाही किंवा आपल्या नागरिकांवर प्रवासी निर्बंध लादले नाहीत. त्यामुळे एका विषाणूचं महामारीत रूपांतर झालं.

china corona
तालिबानची पुनरावृत्ती? TPLF दहशतवादी राजधानीच्या दिशेने; इथिओपियामध्ये आणीबाणी

इतर देश राजकारण करत असल्याचा आरोप

वुहानच्या प्रयोगशाळेत हा विषाणू तयार करण्यात आल्याचा दावा अनेक वैज्ञानिकांनी केला आहे. याची जागतिक आरोग्य संघटनेने चौकशी केली. यासाठी WHOची एक टीम चीनला पोहोचली होती. मात्र तिथंही या टीमला अंधारात ठेवण्यात आलं, संपूर्ण माहिती देण्यात आली नाही. अलीकडे, पुन्हा एकदा तपासाचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा चीनने त्यास नकार दिला. उलट इतर देश राजकारण करत असल्याचा आरोप चीन करु लागला. त्यामुळेच चीन स्वतःवरील डाग काढण्यासाठी आता इतर देशांची बदनामी करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com