पाकिस्तानीच म्हणतात, 'सरकार लाज वाटू द्या, भारताकडून काहीतरी शिका'

वृत्तसेवा
Sunday, 2 February 2020

  • चीनमधील पाकिस्तानी विद्यार्थ्यांना आणण्यास पंतप्रधानांचा नकार

इस्लामाबाद : चीनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांना आणण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानी विद्यार्थी संतप्त झाले आहेत. सरकारला त्यांनी घरचा आहेर देत सरकारला लाज वाटायला हवी असल्याचे म्हटले आहे. तसेच, भारताकडून काहीतरी शिकण्याचा सल्लाही या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या विद्यार्थ्यांनी एक व्हिडिओ करत त्यात म्हटले आहे की, आम्ही पाकिस्तानी विद्यार्थी आहोत जे चीनमध्ये अडकून आहोत. आम्हाला आमचे सरकार म्हणत आहे की, आपण जिवंत रहा किंवा मरा, या आजाराची लागण होत असेल तर होऊ द्या. आम्ही तुम्हाला देशात आणणार नाही किंवा कोणतीही सुविधा पुरवणार नाही. सरकारला भारताकडून काही शिकण्याची गरज आहे की, ते कसे आपल्या नागरिकांची मदत करीत आहेत.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वर्षाला होतात तब्बल एवढे कोटी रुपये खर्च

तत्पूर्वी, चीनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांना आणण्यास त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने नकार दिला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना पाकिस्तानचे काही विद्यार्थी चीनमध्ये अडकून आहेत. मात्र, पाकिस्तान सरकारने या विद्यार्थांना वाचवण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले नाही. यावरून देशात वातावरण संतप्त असून विद्यार्थ्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करायला सुरवात केली आहे. इम्रान खान यांना भारताकडून शिकण्याचा सल्लाही काहींनी दिला आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये भारतीय विद्यार्थी आपल्या देशात परतण्यासाठी एका बसमध्ये बसताना दिसत आहेत. या बसचे एका पाकिस्तानी विद्यार्थीनीने आपल्या फोनच्या कॅमेरॅमध्ये चित्रीकरण केलं आहे.

हा व्हिडिओ पत्रकार नायला इनायत यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत विद्यार्थिनी म्हणत आहे की, हे लोक भारतीय विद्यार्थी आहेत. त्यांना परत आणण्यासाठी त्यांच्या दुतावासाने एक बस पाठवली आहे. वुहान विद्यापीठातून ही बस विमानतळापर्यंत नेली जाईल. त्यानंतर या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले जाईल असे सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani student in Wuhan shows how Indian students are being evacuated by their govt