आपण यांना ओळखलंत का? माजी मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल!

टीम ई-सकाळ
Saturday, 25 January 2020

आतापर्यंत माजी मुख्यमंत्र्यांसह दगडफेक करणाऱ्या तसेच शांतता बिघडू पाहणाऱ्या अशा 5161 लोकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.

श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरला विशेष अधिकार देणारे 370 वे कलम केंद्र सरकारने हटवल्यानंतर येथील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना आणि नेत्यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत नजर कैदेत ठेवण्यात आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यातच शनिवारपासून खोऱ्यातील 20 जिल्ह्यांमध्ये शनिवार (ता.25) पासून इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर येथील माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांचा फोटो व्हायरल झाला असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

- मोदी, शहांना विरोध केल्यास तुम्ही शहरी नक्षलवादी : राहुल गांधी

शनिवारी व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एरवी एकदम चकाचक दाढीमध्ये वावरणारे उमर अब्दुल्लांचा वाढलेल्या दाढीतील फोटो समोर आला आहे. उमर हे 5 ऑगस्ट पासून श्रीनगर येथील हरी निवस या त्यांच्या घरी नजरकैदेत आहेत.

दरम्यान, उमर अब्दुल्लांसह जम्मू-काश्मीरच्या इतर दोन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांना मोबाईल वापरण्याची परवानगी अजून देण्यात आली नव्हती.

- सुरेश वाडकरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून हे तिन्ही नेते नजरकैदेत आहेत. यामुळे केंद्र सरकार टीकेचे धनी झाले आहे. मात्र, डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने 'कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडू नये यासाठी काही पावले उचलली गेली आहेत,' असे स्पष्टीकरण दिले होते. 

- हिंदुत्व चळवळीला राज्यघटना अमान्य; शशी थरूर यांचे वक्तव्य

आतापर्यंत माजी मुख्यमंत्र्यांसह दगडफेक करणाऱ्या तसेच शांतता बिघडू पाहणाऱ्या अशा 5161 लोकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Photo of former CM Omar Abdullah with long beard viral on social media