अफगाणिस्तानात मृत्यू पावलेल्या दानिश सिद्दीकीच्या पालकांची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव | Danish Siddiqui | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Danish Siddiqui

अफगाणिस्तानात मृत्यू पावलेल्या दानिश सिद्दीकीच्या पालकांची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव

अफगाणिस्तानमधील युद्धाचे कव्हरेज करणारे पुलित्झर पुरस्कार विजेता भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांच्या कुटुंबाने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयासमोर (International Criminal Court) त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आणि तालिबानचे नेते आणि उच्चस्तरीय कमांडर यांच्यासह जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. कुटुंबाचे वकील अवी सिंह यांनी ही माहिती दिली आहे. (Photojournalist Danish Siddiqui)

हेही वाचा: इम्रान खान यांची गच्छंती अटळ?; नवाज शरीफांच्या पक्षाकडून PM उमेदवार घोषित

दानिशचे पालक अख्तर सिद्दीकी आणि शाहिदा अख्तर यांच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दानिशला मारण्यापूर्वी तालिबानी सैनिकांनी (Taliban) त्यांच्या मुलाला ओलीस ठेवण्यात आले होते. तसेच त्याचा शारीरिक छळ केला होता. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याचे म्हटले आहे. आपल्या मुलाची अशा प्रकारे हत्या करणे हा केवळ हत्येचा गुन्हा नाही तर मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे असे दानिशच्या पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तालिबान आणि त्यांच्या नेत्यांवर फौजदारी खटला चालवावा तसेच या गुन्ह्याप्रकरणी त्यांना कठोर शिक्षेची मागणी दानिश यांच्या पालकांनी केली आहे.

हेही वाचा: प. बंगालमध्ये हिंसाचार अन् जंगलराज; राज्यपालांचा ममतांवर हल्लाबोल

दानिश पत्रकार आणि भारतीय असल्यामुळे बेकायदेशीरपणे मारला गेल्याचा दावा सिंग यांनी केला आहे. दानिश सिद्दीकी (38) यांची गेल्या वर्षी 16 जुलै रोजी अफगाणिस्तानात (Afghanistan) युद्धाचे कव्हरेज करताना हत्या करण्यात आली होती. सिद्दीकी कंदाहार शहरातील स्पिन बोल्डक जिल्ह्यात अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यातील संघर्ष कव्हर करत होते. दानिश सिद्दीकी हे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्ससाठी काम करत होते. एवढेच नव्हे तर, त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी दानिश यांना पुलित्झर पारितोषिक देऊनही गौरवण्यात आले होते.

Web Title: Photojournalist Danish Siddiquis Parents File Case Against Taliban In International Criminal Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top