'माझ्याकडे होते फक्त पाच सेकंद': आता होतोय कौतुकाचा वर्षाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'माझ्याकडे होते फक्त पाच सेकंद': आता होतोय कौतुकाचा वर्षाव
'माझ्याकडे होते फक्त पाच सेकंद': आता होतोय कौतुकाचा वर्षाव

'माझ्याकडे होते फक्त पाच सेकंद': आता होतोय कौतुकाचा वर्षाव

सोशल मीडियावर (photo viral on social media) वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल झालेल्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले जाते. त्यावरील व्हिडिओजला देखील नेटकरी गंमतीशीर प्रतिक्रिया (comment) देत असतात. सध्या व्हायरल झालेल्या एका फोटोला नेटकऱ्यांनी दाद दिली आहे. त्या फोटोचं कौतूकही केलं आहे. तो फोटोच एवढा जबरी आहे की, त्यावर कुणीही पटकन प्रतिक्रिया देईल. इस्त्राईलच्या (israel) त्या फोटोग्राफर्सनं कमाल करत ज्या कुशलतेनं क्लिक केलं त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्यानं तो फोटो व्हायरल केला आहे. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनी चमच्याचा आकार घेतला होता. त्याकडे त्या फोटोग्राफर्सची (photographers) नजर गेली अन्....

चाणाक्ष आणि कल्पक फोटोग्राफर्सच्या नजरेतून काही सुटत नाही असं सांगितलं जात. असंच काहीसं त्या फोटोग्राफर्सच्या बाबत झालं आहे. त्यानं टिपलेल्या फोटोचं कौतूक होताना दिसत आहे. सोशल मीडियावर तो फोटो व्हायरल झाला आहे. इस्त्राईलच्या वन्यजीव फोटोग्राफर अल्बर्ट केशेटनं (Albert Keshet) तो फोटो टिपला आहे. त्यानं ज्या कौशल्यानं तो फोटो घेतला आहे त्याचे कौतूक होत आहे. जॉर्डनच्या दऱीखोऱ्यातील तो फोटो आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील त्यानं सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्याठिकाणी हवेत मुक्त संचार करणाऱ्या पक्ष्यांनी चमचाचा आकार घेतला. तो क्षण अल्बर्टनं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. माझ्याकडे केवळ पाच सेकंद होते तेवढ्यात मी तो फोटो कैद केल्याचे त्यानं आपल्या व्टिटमध्ये सांगितलं आहे.

हेही वाचा: Viral Video: ट्रेनची वासराला धडक; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

त्या पाच सेकंदाच्या अंतरामध्ये त्या पक्ष्यांनी चमच्याचा आकार घेतला होता. मला काही करुन तो आकार टिपायचा होता. आणि तो क्षण मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. निसर्गात मुक्तपणे विहार करणाऱ्या पक्ष्यांनी केलेल्या त्या अद्भुत देखाव्याला अल्बर्टनं कॅमेरामध्ये बंदिस्त केलं आहे.

हेही वाचा: Video: अँडरसनने स्मिथला टाकलेला इनस्विंग होतोय चांगलाच Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top