फोटोशूट करायला गेले, चिखलात पडले: सोशल मीडियावर व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

photoshoot viral
फोटोशूट करायला गेले, चिखलात पडले: सोशल मीडियावर व्हायरल

फोटोशूट करायला गेले, चिखलात पडले: सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर (social media) वेगवेगळे फोटो (photo) आणि व्हिडिओ (video) यांची कायम चलती असते. नेटकऱ्यांना काही करुन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहायचे असते. अनेक सेलिब्रेटी त्यांचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करुन चाहत्यांकडून लोकप्रियता मिळवत असतात. अशावेळी अनेकांना आपणही चर्चेत राहावं असं वाटत असल्यानं गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर फोटोशुट, व्हिडिओ यांना मोठी मागणी आहे. त्यांची लोकप्रियताही मोठी आहे. वेडिंग फोटोशुट (Wedding Photoshoot) हा नेहमीच चर्चेत असणारा विषय आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याला भलतचं ग्लॅमर मिळालं आहे. हल्ली तर गावापर्यत त्याचं फॅड पोहचलं आहे. प्रत्येकाला त्याच्या लग्नात काही हटके करायची ओढ असते. मात्र अनेकदा ही ओढ त्याच्यासाठी धोकादायकही ठरु शकते याचा विचार होताना दिसत नाही.

सोशल मीडियावर एक फोटोशुट व्हायरल झालं आहे. त्यामध्ये त्या जोडप्यानं फोटोशुट करण्याचा निर्णय घेतला. वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटोशुट करताना असं काही घडलं की त्यांची फजितीच झाली. लग्नाच्या वेशभूषेत असणाऱ्या त्या जोडप्याला वेगळ्याच प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. झालं असं की, त्यांचे फोटोशुट सुरु होते. त्याच वेळी ते चिखलात पडल्यानं त्यांच्यावर फजितीची वेळ आली. काही वेळ त्यांना काय करावं हेच सुचेनासं झालं. अशावेळी त्या फोटोग्राफर्सनं त्यांची मदत करुन त्यांना त्या संकटातून सोडवले. चिखलात पडलेले त्या जोडप्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा: देशात २४ तासात ३७,३७९ नवे कोरोना रुग्ण, ओमिक्रॉनही १८०० पार

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामिला (Kamilla) आणि मुर्त (Murat) यांच्या लग्नाचं फोटोशुट (Wedding Photoshoot) सुरु होतं. ते त्यामध्ये व्यस्त होते. त्या दरम्यान झालेल्या फजितीनं त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. टीकटॉकवर शेयर झालेल्या या व्हिडिओला आतापर्यत 21 मिलियन पेक्षाही जास्त व्ह्युज मिळाले आहेत. यापूर्वी देखील अनेकांनी साहसाच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशुट केल्याचे दिसून आले आहे. त्याला नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. फोटोग्राफर असकर बुमागानं हे फोटोशुट व्हायरल केलं आहे. (Askar Bumaga)

हेही वाचा: 'बाहों में चले आओ'...प्रियांका-निकचे रोमॅंटिक फोटोज झाले व्हायरल

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top