Physics Wallah : फिजिक्सवालाचा वाद वाढला; शिक्षकांचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल; 5 कोटी लाच घेतल्याचा आरोप फेटाळला

एडटेक युनिकॉर्न फिजिक्स वालाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
Physics Wallah
Physics WallahSakal

Physics Wallah Viral Video : एडटेक युनिकॉर्न फिजिक्स वालाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शिक्षकांचा एक ग्रुप एखाद्या रिअॅलिटी शोप्रमाणे भांडताना दिसत आहे. शिक्षकांच्या एका ग्रुपने संस्थापक अलख पांडे यांच्यावर लाचखोरी आणि अंतर्गत राजकारणाचा आरोप केला आहे.

फिजिक्स वाला संस्थेचे शिक्षक तरुण कुमार, मनीष दुबे आणि सर्वेश दीक्षित यांनी अलख पांडे यांच्याशी मतभेद झाल्यामुळे नोकरी सोडल्याची माहिती आहे. फिजिक्सवालाचे रसायनशास्त्र शिक्षक पंकज सिजारिया यांनी त्यांच्यावर फिजिक्सवाला सोडण्यासाठी अड्डा 247 या अन्य प्रतिस्पर्धी शिक्षण संस्थेकडून लाच घेतल्याचा आरोप केला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शिक्षकांनी एडटेक युनिकॉर्न फिजिक्स वालापासून वेगळे झाल्यानंतर स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. मनीष दुबे, तरुण कुमार आणि सर्वेश दीक्षित अशी या शिक्षकांची नावे आहेत. (Physics Wallah caught in controversy as ex-teachers cry on camera deny charges of Rs 5 cr bribe)

या तीन शिक्षकांनी एडटेक युनिकॉर्न फिजिक्स वालाचे संस्थापक अलख पांडे यांच्यावर लाच घेतल्याचा आणि अंतर्गत राजकारण केल्याचा आरोप केला आहे. अलख पांडे यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी नोकरी सोडल्याचे शिक्षकांनी सांगितले. यादरम्यान त्यांनी लाचखोरीबाबतही सांगितले आहे.

Physics Wallah
Gautam Adani: अदानी-हिंडेनबर्ग वादात PM मोदींच्या आर्थिक सल्लागाराचे सूचक वक्तव्य; म्हणाले...

दर्जेदार, परवडणारे शिक्षण प्रदान करण्याचे फिजिक्सवालाचे ध्येय संस्थेची वाढ झाल्यामुळे बाजूला पडले आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तीन शिक्षकांनी एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये त्यांच्यावरील आरोपांवर ते स्पष्टीकरण देत आहते.

त्यांनी लाच म्हणून 5 कोटी रुपये दिल्याचे नाकारले आणि दावा केला की फिजिक्सवाला येथील वातावरण आता शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी अनुकूल नाही.

YouTube वर केवळ एका दिवसात जवळपास 1.9 दशलक्ष लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. शिक्षण सर्वांना परवडणारे बनवण्याच्या उद्देशाने अलख पांडे यांनी 2020 मध्ये PhysicsWallah ची स्थापना केली.

कंपनी सध्या किमान 250 दशलक्ष डॉलर उभारण्यासाठी चर्चेत आहे, जे तिच्या सध्याच्या मूल्यांकनाच्या तिप्पट आहे, जे एडटेक स्टार्ट-अपसाठी महत्त्वपूर्ण मूल्यांकन मार्क-अप असू शकते.

Physics Wallah
नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com