Coronavirus : भारत लॉकडाऊनमध्ये जाईल? जाणून घ्या सत्य!

टीम ई-सकाळ
Monday, 16 March 2020

विवाहसोहळे वगळता ५० हून अधिक लोक जमतील अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाने देशभरात खळबळ उडवून दिली असल्याने भारत लॉकडाऊनमध्ये जाईल, अशी अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हॉट्सअॅपवरही शेअर केली जात आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मात्र, हे वृत्त खोटे असल्याचे ट्विट सरकारी न्यूज एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी)ने केले आहे. भारत लॉकडाऊनमध्ये जाणार नाही. त्यामुळे कृपया अशा अफवा पसरवू नका, असे म्हणत याचे खंडन केले. यासोबत पीआयबीने ट्विटसोबत मदतपुस्तिकाही जोडली आहे.

- म्हणून, युरोपमध्ये वाढतायत कोरोनाचे बळी; इटली, फ्रान्समध्ये चिंताजनक स्थिती

'त्या' मुलीलाही कोरोनाची लागण

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या देशातील पहिल्या व्यक्तीच्या मुलीलाही कोरोना झाल्याने निष्पन्न झाले आहे. संबंधित मुलीची रविवारी (ता.१५) तपासणी करण्यात आली. यावेळी तिला कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्टमधून स्पष्ट झाले. तिच्यावर योग्य ते उपचार करण्यात येत असल्याची माहिती कर्नाटकच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. कोरोनाची लागण झाल्याने कर्नाटकमधील ७६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ते सौदी अरेबियाचा प्रवास करून भारतात आले होते. त्यावेळीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 

- कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?

सुप्रीम कोर्टात केली जातेय थर्मल स्क्रीनिंग

कोरोना व्हायरसची लागण कोणाला झाली आहे, हे सहजासहजी दिसून येत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग टेस्ट करण्यात येत आहे. देशात आतापर्यंत शंभराहून अधिक कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तसेच आतापर्यंत दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने याबाबत अधिक खबरदारी घेण्यात येत आहे.

लग्न सोहळे पुढे ढकला : मुख्यमंत्री

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यायामशाळा, नाईट क्लब आणि मॉल्स, शाळा-महाविद्यालये आणि चित्रपटगृहे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काही ठिकाणी विवाहसोहळे आयोजित करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. त्यामुळे विवाहसोहळे वगळता ५० हून अधिक लोक जमतील अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच विवाहसोहळेही शक्यतो पुढे ढकलण्याची विनंती मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली आहे. 

- Coronavirus : कोरोनाला घाबरू नका; हवी ती माहिती मिळवा एका क्लिकवर

आयआयटीच्या ९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणे?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकीमधील एका परदेशी आणि ८ भारतीय नागरिकांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांना स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. या
सर्व विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू असून असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरम्यान, इराणच्या तेहरान आणि शिराझ या शहरांतून २३४ भारतीयांना रविवारी भारतात आणण्यात आले. त्यानंतर आज (ता.१६) आणखी ५३ भारतीयांचे जैसलमेर विमानतळावर आगमन झाले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना शहरातील आर्मी वेलनेस सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PIB announced that audio clip claiming India will go into a lockdown due to coronavirus is fake