उज्ज्वला गॅस एजन्सी LPG डिस्ट्रिब्युटरशिप देत असल्याचा दावा खोटा; PIB ने केलं स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

सोशल मीडियावरून सतत काही ना काही व्हायरल होत असतं. त्यामध्ये खरं काय आणि खोटं काय याची शहानिशा केली जात नाही.

नवी दिल्ली - सोशल मीडियावरून सतत काही ना काही व्हायरल होत असतं. त्यामध्ये खरं काय आणि खोटं काय याची शहानिशा केली जात नाही. लोकांची फसवणूक कऱण्यासाठी काही वेळा चुकीची माहिती पसरवली जाते. आताही अशाच प्रकारचा मेसेज व्हायरल होत आहे.

उज्ज्वला गॅस एजन्सीच्या नावाने एक मेसेज फॉरवर्ड होत आहे. त्यामध्ये असा दावा करण्यात येत आहे की, एलपीजी डिस्ट्रिब्युटरशिप ऑफर केली जात आहे. पीएसयू ऑइल मार्केटिंग कंपनीच्यावतीने ही जाहिरात दिल्याचंही म्हटलं आहे. 

पीआयबीने याबाबत फॅक्ट चेक केला असून अशी कोणतीही योजना किंवा डिस्ट्रिब्युटरशिप देण्याची ऑफर नसल्याचं म्हटलं आहे. वेबसाइट आणि त्यावर करण्यात आलेला दावा खोटा आहे. पीआयबीने लोकांना सांगितलं की, ऑइल मार्केटिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. http://lpgvitarakchayan.in वर तुम्हाला एलपीजी डिस्ट्रिब्युटरशिपबाबत अधिकृत माहिती मिळेल. 

हे वाचा - Guinness Record: सहा वर्षांचा अरहम ठरला जगातील सर्वात लहान कॉम्प्युटर प्रोग्रॅमर

ट्विटरवरून पीआयबी अशा अनेक खोट्या, व्हायरल होत असलेल्या माहितीची शहानिशा करून त्याबाबत जागरुकता निर्माण करत असते. याआधीही अनेकदा सरकारी योजनांबद्दलचे चुकीचे मेसेज व्हायरल झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pib fact check fake claim ujjwala gas agency lpg distributorship