पिकअप उलटून भीषण अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू, २० जण गंभीर जखमी; घटनास्थळी मृतदेहांचा खच

Dhar Pickup Accident News मजुरांना घेऊन जाणारी पिकअप गाडी अनियंत्रित होऊन उलटली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळी मृतदेहांचा खच पडला होता.
Major Road Accident in Dhar Leaves Multiple Casualties

Major Road Accident in Dhar Leaves Multiple Casualties

Esakal

Updated on

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात बुधवारी रात्री पिकअप उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून १० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. चिकलिया इथं रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. मजुरांना घेऊन जाणारी पिकअप गाडी अनियंत्रित होऊन उलटली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळी मृतदेहांचा खच पडला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com