Supreme Court
Supreme Courtesakal

100 वर्षांहून अधिक जुन्या मशिदींचं गोपनीय सर्वेक्षण करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका

Published on
Summary

मंदिर-मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय.

वाराणसी : सध्या सुरू असलेल्या मंदिर-मशीद वादाच्या (Gyanvapi Masjid Survey) पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जनहित याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत (Archaeological Survey of India) देशातील शंभर वर्षांहून अधिक जुन्या आणि प्रमुख मशिदींचं गोपनीय सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडं केली गेलीय.

Supreme Court
योगींची मोठी घोषणा, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला मिळणार सरकारी नोकरी

शंभर वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या प्रमुख मशिदींतील तलाव आणि विहिरींमधून वुजू हलवण्याचे निर्देशही जनहित याचिकेत मागितले आहेत. 'वुजू' ही एक इस्लामिक प्रक्रिया आहे, जी मशिदींमध्ये जाण्यापूर्वी शरीराचं अवयव स्वच्छ करण्यासाठी केली जाते. अशा मशिदींचं गोपनीय सर्वेक्षण केलं जाऊ शकतं, जेणेकरुन तेथून काही अवशेष आढळल्यास अनावश्यक जातीय तणाव आणि धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार टाळता येतील, असं याचिकात म्हटलंय. ही जनहित याचिका अधिवक्ता शुभम अवस्थी यांच्या वतीनं अधिवक्ता विवेक नारायण शर्मा यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय.

Supreme Court
भाजपला मतदान करणं मुस्लिम कुटुंबाला पडलं महागात; अन्न-पाण्यावर बंदी

दरम्यान, गोपनीय सर्वेक्षण करून अहवाल सादर होईपर्यंत विवादित मालमत्ता कोणत्याही पक्षाकडून किंवा त्यांच्या हस्तक्षेपापासून मुक्त ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी सप्त ऋषी मिश्रा यांनी केलीय. न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत 100 वर्षांहून अधिक जुन्या आणि महाभारत, रामायण, पुराण, वेद व उपनिषदांमध्ये असल्यामुळं वादात असलेल्या सर्व प्राचीन आणि प्रमुख मशिदींचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडं करण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com