

Passenger Beaten in Front of Family by Off Duty Pilot
Esakal
दिल्ली विमानतळावर एका प्रवाशाला ऑफ ड्युटी पायलनं मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विमान प्रवासावेळी विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी बराच वेळ प्रवाशांना उभा रहावं लागतं. अशीच सुरक्षा तपासणी सुरू असताना दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल एक वर पायलट आणि प्रवाशामध्ये मारहाण झाली. प्रवाशाने आरोप केला की, एअर इंडिया एक्सप्रेसच्या ऑफ ड्युटी पायलनं माझ्यावर हल्ला केला. यामुळे चेहऱ्याला जखम झाली असून त्यातून रक्त येत होतं.