Air India Crash: एअर इंडिया विमान अपघाताच्या अंतरिम अहवालात वैमानिकांच्या चुकांकडे निर्देश करण्यात आला आहे. मात्र एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने हे आरोप फेटाळले आहेत.
नवी दिल्ली : देशातील वैमानिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एएलपीए) अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताच्या अंतरिम चौकशी अहवालातील वैमानिकांच्या चुकांकडे अंगुलीनिर्देश करणारा मुद्दा ठामपणे फेटाळला आहे.