मेंहदी लागताच नवरीचा कारनामा; नवरदेवाला अखेर मेहुणीबरोबर करावं लागलं लग्न; असं काय घडलं?

Unique Wedding Stuns : नवरदेवाच्या कुटुंबियांना याची काहीच कल्पना नव्हती. लग्नाचा मुहूर्तही जवळ येत होता. मोठी मुलगी न मिळाल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले होतं. तेवढ्यात मुलीच्या वडिलांनी त्याच्या कुटुंबियांना फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली.
Unique Wedding Stuns

Unique Wedding Stuns

esakal

Updated on

मेंहदी लागल्यानंतर नवरी घरातून पळून गेल्याने नवरदेवाने थेट मेहुणीबरोबर लग्न केलं आहे. उत्तराखंडातील पिथौरागढ जिल्ह्यात ही घटना घडली असून या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे मेहणुबरोबर विवाह करण्याचा प्रस्ताव चक्क होणाऱ्या सासऱ्याने दिल्याने परिसरात याची जोरदार चर्चा सुरु आहे. सासऱ्याने फोन करून नवरदेवाच्या वडिलांना मुलगी पळून गेल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कुटुंबाची लाज राखण्यासाठी छोट्या मुलीशी लग्न करण्यचा प्रस्ताव ठेवला. त्याला नवरदेवाच्या कुटुंबियांनीही होकार दिला. त्यानंतर हा विवाह सोहळा पार पडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com