

medical college in the border district of Pithoragarh
esakal
चीन आणि नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यात आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. सुमारे ७०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले बाबू जगजीवन राम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. या महाविद्यालयात हरियाणाची युविका प्रवेश घेणारी पहिली विद्यार्थिनी ठरली असून, राजस्थानमधील झुंझुनू येथील मिलन हिने दुसरा प्रवेश मिळवला आहे.