
नवी दिल्ली : भेदभाव झाल्यास भारत झुकणार नाही आणि १४० कोटी लोकांच्या स्वाभिमानाचे रक्षण करेल, अशी ग्वाही वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आज दिली. ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० टक्के व्यापार शुल्क आकारल्यामुळे भारत- अमेरिका संबंध ताणले गेले असताना त्या पार्श्वभूमीवर वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.