
Uttar Pradesh
उत्तर प्रदेशामध्ये जेम (GeM) पोर्टलद्वारे सरकारी खरेदी केल्याच्या उपक्रमावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून अभिनंदन केले आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हणाले की, GeM पोर्टलद्वारे सरकार मार्फतची खरेदी वाढविण्यात उत्तर प्रदेश सरकारने मोठा वाटा उचलला आहे. त्यांनी मागील पाच वर्षांमध्ये उत्तर प्रदेश सरकारकडून पोर्टलद्वारे करण्यात आलेल्या खरेदीचा डेटा देखील शेअर केला आहे.
GeM हे Government-E-Marketplace (GeM) हे एक राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टल आहे. याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्रालये/विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, स्वायत्त संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वस्तू आणि सेवांची ऑनलाईन खरेदी केली जाऊ शकते.