मोदी सरकारकडे लवकरच 'राम सर्किट'चा प्रस्ताव

वृत्तसंस्था
शनिवार, 22 डिसेंबर 2018

चेन्नई : 'रामायणा'तील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा प्रस्ताव तमिळनाडू सरकार तयार करत आहे. यासंदर्भात लवकरच केंद्र सरकारकडे 'राम सर्किट'चा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यामुळे श्रीलंका आणि तमिळनाडूमधील धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. 

'इंडिया टुडे'च्या एका कार्यक्रमात तमिळनाडू सरकारचे पर्यटन विभागाचे सचिव अपूर्व वर्मा यांनी ही माहिती दिली. रामायणाशी संबंधित तमिळनाडू आणि श्रीलंकेमधील सर्व ठिकाणांना पर्यटनाच्या माध्यमातून जोडण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यातून धार्मिक पर्यटनाला चालना मिळू शकेल आणि तमिळनाडू पर्यटनाच्या नकाशावर येईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. 

गोवा किंवा केरळच्या तुलनेत तमिळनाडू पर्यटकांना आकर्षित करण्याच्या बाबतीत पिछाडीवर आहे. त्यासंदर्भात वर्मा म्हणाले, 'तमिळनाडूमध्ये बर्फ आणि वाळवंट सोडून सगळे काही आहे. हिल स्टेशन, नयनरम्य समुद्रकिनारे आणि भव्य मंदिरे हे तमिळनाडूचे वैभव आहे. एखादा माणूस धार्मिक नसेल, तरीही तो येथील मंदिरांच्या प्रेमात पडू शकतो.'' 

'उत्तर भारतामध्ये हिमालय, राजस्थानचे किल्ले किंवा ताज महाल या गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. आम्ही आता या गोष्टींमध्ये तमिळनाडूचीही भर घालण्याचा प्रयत्न करत आहोत', असे वर्मा यांनी सांगितले. तमिळनाडूसाठी 'राम सर्किट' हा प्रकल्प त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

Web Title: Places of Ramayana now on tourism map