ममता बॅनर्जी यांच्या जीवाला धोका: तृणमूल कॉंग्रेस

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विमानाने बुधवारी "इमरजन्सी लॅंडिंग' केल्याचे सांगत त्यांच्या जीवाला धोका असल्याचे मत तृणमूल पक्षाने आज (गुरुवार) संसदेत व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विमानाने बुधवारी "इमरजन्सी लॅंडिंग' केल्याचे सांगत त्यांच्या जीवाला धोका असल्याचे मत तृणमूल पक्षाने आज (गुरुवार) संसदेत व्यक्त केले आहे.

बॅनर्जी बुधवारी इंडिगोच्या विमानाने पाटनापासून कोलकाताच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही वेळातच विमानाने पुन्हा लॅंडिंग केले. त्यापूर्वी विमानतळावर लॅंडिंगसाठी जागा उपलब्ध नव्हती म्हणून 30 मिनिटे विमानाने हवेतच फेऱ्या मारत प्रतिक्षा केली. "इमरजन्सी लॅंडिंग'च्या शिष्टाचारानुसार लॅंडिंग झाल्यानंतर विमानाभोवती अग्निशामक दल आणि अँम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती. "विमान क्रॅश होणार होते... आम्हाला असे समजले आहे की ममता बॅनर्जी यांच्या जिवाला धोका होता', अशा प्रतिक्रिया तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी संसदेत उपस्थित केली. दरम्यान "इंडिगो'ने विमानाच्या लॅंडिंगबद्दल माहिती दिली आहे. त्यामध्ये विमानाच्या पायलटने "आठ मिनिटे अधिकचे इंधन' आहे असा संदेश हवाई वाहतूक नियंत्रकांना दिला होता. मात्र नियंत्रकांनी त्याचा अर्थ "केवळ आठ मिनिटांचे इंधन बाकी आहे' असा घेतला आणि विमानाचे लॅंडिंग करण्याच्या सूचना दिल्या.

बंडोपाध्याय यांना उत्तर देताना हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले की केवळ बॅनर्जी प्रवास करत असलेल्या "इंडिगो'च्या विमानाचेच नव्हे तर "स्पाईस जेट' आणि 'एअर इंडिया'च्याही विमानांचे इंधनाच्या कारणामुळे एमरजन्सी लॅंडिंग करावे लागल्याचे सांगितले. तसेच या तीनही विमानांच्या एमरजन्सी लॅंडिंगप्रकरणी हवाई वाहतूक महासंचालक चौकशी करत असल्याचेही सांगितले.

Web Title: Plane Problem Shows Mamata Banerjee Life In Danger, Party Tells Parliament