दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट; संशयितांना कोठडी

पीटीआय
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : देशभर विविध ठिकाणांवर दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट आखणाऱ्या दहा संशयितांना दिल्लीतील न्यायालयाने आज बारा दिवसांची कोठडी सुनावली.

"इसिस' या दहशतवादी संघटनेकडून प्रेरणा घेत स्थापन झालेल्या या दहा जणांच्या गटाने विविध सरकारी संस्थांवर हल्ले करण्याबरोबरच राजकीय नेत्यांनाही लक्ष्य करण्याचा कट आखला होता. विशेष तपास पथकाने (एनआयए) बुधवारीच सर्वांच्या मुसक्‍या आवळल्या होत्या. पुढील चौकशी करण्यासाठी या सर्वांना पंधरा दिवसांची कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी तपास संस्थेकडून न्यायालयामध्ये करण्यात आली होती. 

तपास संस्थेच्या उपरोक्त मागणीला आरोपीचे वकील एम.एस.खान यांनी विरोध केला, तपाससंस्थेने सर्व माहिती आधीच मिळवली असून ती बुधवारीच पत्रकार परिषदेत मांडण्यात आल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला. या आरोपींची कोठडीतील चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना 8 जानेवारी रोजी न्यायालयामध्ये सादर करण्यात येईल. 

इन कॅमेरा सुनावणी 

आज दहाही आरोपींना कडेकोट बंदोबस्तामध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजय पांडे यांच्यासमोर सादर करण्यात आले. या वेळी सर्व आरोपींचे चेहरे झाकण्यात आले होते. विशेष म्हणजे या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा झाली. या सर्व संशयितांना उत्तर प्रदेशसह अन्य भागांतून ताब्यात घेण्यात आले होते. ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आरोपींना त्यांच्या नातेवाइकांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली होती. या वेळी काहींच्या नातेवाइकांनी संबंधितांची ओळखपत्रेही सोबत आणली होती. 

Web Title: Planning of Terror Attacks Custody to Suspects