मायक्रोवेव्ह ओव्हनसाठी प्लॅस्टिकची भांडी धोकादायक 

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

पदार्थ झटपट गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर सर्रास केला जातो. अगदी चहापासून जेवणातील पदार्थ यात एका मिनिटात गरम होत असल्याने गृहिणींमध्ये मायक्रोवेव्ह लोकप्रिय आहे. मात्र यात अन्न गरम करताना प्लॅस्टिकच्या भांड्यांचा वापर केला जात असेल, तर सावधानता बाळगण्याची गरज आहे. शास्त्रज्ञांच्या मते मायक्रोवेव्हसाठी प्लॅस्टिकची भांडी वापरल्यास वंध्यत्व, उच्च रक्तदाब, स्थूलत्व, मधुमेह व अगदी कर्करोग होण्याचा धोका संभवतो. प्लॅस्टिकची भांडी मायक्रोव्हेवमध्ये गरम केल्यास त्यातील 95 टक्के रसायने बाहेर पडतात, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली - पदार्थ झटपट गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर सर्रास केला जातो. अगदी चहापासून जेवणातील पदार्थ यात एका मिनिटात गरम होत असल्याने गृहिणींमध्ये मायक्रोवेव्ह लोकप्रिय आहे. मात्र यात अन्न गरम करताना प्लॅस्टिकच्या भांड्यांचा वापर केला जात असेल, तर सावधानता बाळगण्याची गरज आहे. शास्त्रज्ञांच्या मते मायक्रोवेव्हसाठी प्लॅस्टिकची भांडी वापरल्यास वंध्यत्व, उच्च रक्तदाब, स्थूलत्व, मधुमेह व अगदी कर्करोग होण्याचा धोका संभवतो. प्लॅस्टिकची भांडी मायक्रोव्हेवमध्ये गरम केल्यास त्यातील 95 टक्के रसायने बाहेर पडतात, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 

मायक्रोमध्ये स्वयंपाक करणे सुरक्षित की अरसुरक्षित याबाबत बोलताना बंगळूरमधील आहारतज्ज्ञ डॉ. अंजू सूद म्हणाल्या, की मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करणे धोकादायक असते, ही बाब अद्याप सिद्ध झालेली नाही. पदार्थ सिरॅमिक किंवा योग्य भांड्यात ठेवून मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये कमी वेळासाठी गरम करायचा असेल तर ते धोकादायक नाही. मात्र प्लॅस्टिक भांड्यांबाबत तज्ज्ञांनी वेगवगळी मते व्यक्त केली आहेत. ""प्लॅस्टिकची भांड्यांत "बिस्फीनॉल' (बीपीए) व थॅलेट हे सर्वांत घातक रसायन असते. "बीपीए' आपल्या रक्तप्रवाहात मिसळते. त्यामुळे वंध्यत्व, संप्रेरकांमध्ये बदल, लिंग गुणधर्मात बदल होऊ शकतो. तसेच विविध प्रकारचा कर्करोग होण्याचाही धोका असतो. प्राण्यांवरही याचा विपरित परिणाम होतो, अशी माहिती "आयव्हीएफ' तज्ज्ञ डॉ. नितिशा गुप्ता यांनी दिली. 

"बीपीए'चा जननक्षमतेवर परिणाम 

"सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन'च्या (सीजीसी) नोंदीनुसार 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नागरिकांच्या शरीरात "बिस्फिनॉल अ' या रसायनाचे अंश आढळतात. यातून "बीपीए'चे प्रमाण लक्षणीय वाढण्याची शक्‍यता असते. स्वंयपाकाशिवाय अन्य ठिकाणीही प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करावा, असे हैदराबाद येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती यांनी सांगितले. ""प्लॅस्टिकचा वापर शक्‍य तितका कमी करण्याचा प्रयत्न करावा. हवाबंद अन्नासाठी काचेच्या बरण्या व भांडी वापरावीत. प्लॅस्टिकप्रमाणे काचेचे रसायनांमध्ये परिर्वतन होत नाही. यातून अन्न गरम करणे अधिक सुरक्षितही असते,'' असे त्या म्हणाल्या. अन्न व औषध प्रशासनच्या अहवालानुसार "बीपीए' सारख्या रसायनांचा पुरुष व महिलांच्या जननक्षमतेवर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी माहिती डॉ. स्वाती यांनी दिली.

Web Title: Plastic pots are dangerous for microwave ovens