कबड्डीच्या मैदानातच खेळाडूचा हार्टअ‍ॅटकने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील गोजी गावात कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी कब्बडीचा सामना सुरु असताना एक खेळाडू अचानक जमिनीवर कोसळला. हा प्रकार एका प्रेक्षकाच्या कॅमेरात कैद झाला. नरेंद्र साहू असे या तरुणाचे नाव असून धमतरी जिल्ह्यातील कोकडी गावाचा रहिवासी होता. 

छत्तीसगड: धमतरी येथील गोजी गावात एका 20 वर्षीय तरूणाचा कबड्डीच्या मैदानातच मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील गोजी गावात कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी कब्बडीचा सामना सुरु असताना एक खेळाडू अचानक जमिनीवर कोसळला. हा प्रकार एका प्रेक्षकाच्या कॅमेरात कैद झाला. नरेंद्र साहू असे या तरुणाचे नाव असून धमतरी जिल्ह्यातील कोकडी गावाचा रहिवासी होता. 

हेही वाचा- काँग्रेस अध्यक्षपदासाठी शिंदे?; कार्यकारिणीची आज बैठक
 
कबड्डी मैदानात एका खेळाडूने पकडले त्यानंतर ही घडले. साहू याने प्रति स्पर्ध्याच्या अंगावर झेप घेऊन पुन्हा मागे फिरला. त्यावेळी एका खेळाडूने त्याला मागून खेचले. बाकी  खेळाडूंनी त्याला मागे ओढण्यास सुरवात केली.  यावेळी त्याच्या मानेला झटका बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

''कब्बडी खेळताना साहूने लवकरच दम सोडला होता आणि नंतर तो बेशुध्द पडला.त्यानंतर तातडीने त्याच्या सहकारी खेळाडूंनी आणि गावच्या सरपंचांनी त्याला कुरूड रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी लगेच त्याला मृत घोषीत केले.'' अशी माहिती कुरूड पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार रामनरेश शेंगर यांनी दिली.

हेही वाचा- काँग्रेसला नवा अध्यक्ष कधी आणि कोण? काय घडलं CWCच्या बैठकीत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Player dies of heart attack on kabaddi ground in chhattisgarh