पर्रीकरांच्या प्रकृतीसंदर्भातली याचिका फेटाळली 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पणजी- मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीबाबतची माहिती उघड करण्यासाठी ट्रोजन डिमेलो यांनी सादर केलेली याचिका गोवा खंडपीठाने फेटाळताना त्यांच्यावर ताशेरे ओढले. याचिकादार डिमेलो हे खंडपीठासमोर स्वच्छ हेतूने आले नाहीत. त्यांचा राजकारणाशी संबंध असल्याची माहिती याचिकेत त्यांनी दडवून ठेवली, असे निरीक्षण खंडपीठाने निवाड्यात नोंदवले आहे. 

याचिकाकर्त्याने पर्रीकर यांच्या आरोग्यासंदर्भात जे मुद्दे उपस्थित करून शंका व अंदाज व्यक्त केले आहेत, ते वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या माहितीच्या आधारे केलेले आहेत. या माहितीसंदर्भातचे पुरावे याचिकादाराने युक्तिवादावेळी सादर केलेले नाहीत. मुख्यमंत्री आजारी आहेत व प्रशासन चालविण्यास त्यांची मानसिक स्थिती नाही, असा मुद्दा याचिकाकर्त्याने उपस्थित करण्यापूर्वी वृत्तपत्रातील माहिती खरी की खोटी आहे याची त्यांनी कोणतीच पडताळणी करण्याची काळजी घेतली नाही. एखाद्या प्रतिस्पर्ध्याला राजकीय हेतू साध्य करायचा असल्यास त्याने लोकशाहीचा मार्ग निवडायला हवा. उच्च न्यायालयासमोर पुराव्याविना याचिका सादर करून मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी त्यात हस्तक्षेप करण्याचा हा प्रयत्न असून त्यात जनहित दिसून येत नाही. याचिकाकर्त्याने मुख्यमंत्र्यांची खासगी व गोपनीय माहिती उघड करण्याची विनंती त्यांना याचिकेत प्रतिवादी न करता केली आहे, त्यामुळे ही याचिका विचारात न घेता फेटाळण्यात येत आहे, असे निवाड्यात स्पष्ट केले आहे. 

Web Title: The plea of ​​Parrikar's was rejected