रायगड बस अपघातावर पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जुलै 2018

नवी दिल्ली : रायगड बस अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर शोक व्यक्त केला. त्यांनी याबाबत ट्विट करून सांगितले, की ''महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील बस अपघाताची माहिती मिळाल्यानंतर याबाबत अत्यंत दु:ख होत आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांचे मी सांत्वन करतो''.

रायगडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मदत करावी

''रायगड बस अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मला अत्यंत धक्का बसला. महाराष्ट्रातील या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहेत. मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या माध्यमातून आवाहन करतो, की या भागातील कार्यकर्त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना आवश्यक मदत करावी''. 

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष 

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अत्यंत दु:खी

''महाबळेश्वर येथील बस अपघातात 32 मृत्यूमुखी पडलेल्या बातमीने मला अत्यंत दुःख झाले असून, प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत देण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्ती गमावल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियांसोबत आम्ही आहोत. त्याचबरोबर अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो''.

 देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: PM condoles the Raigad bus accident