मोदींना 'शहजाद्यां'कडून 'व्हिसा' घेण्याची गरज नाही : भाजप

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी येथील रोड शो "अनधिकृत' असल्याची टीका करणाऱ्यांवर भारतीय जनता पक्षाने निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शहजादा संबोधित त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "व्हिसा' घेण्याची गरज नसल्याची टीका भाजपने केली आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी येथील रोड शो "अनधिकृत' असल्याची टीका करणाऱ्यांवर भारतीय जनता पक्षाने निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शहजादा म्हणत त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "व्हिसा' घेण्याची गरज नसल्याची टीका भाजपने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप नेते श्रीकांत शर्मा म्हणाले, "लोकांना भेटण्यासाठी, देवाचे दर्शन घेण्यासाठी आम्हाला अखिलेश आणि राहुल या शहजाद्यांकडून परवानगी घेण्याची गरज नाही. वाराणसी हा मोदींचा मतदारसंघ आहे. त्यामुळे त्यांना ज्यादिवशी वाटेल त्यादिवशी ते तेथे भेट देऊ शकतात. आम्हाला शहजाद्यांकडून व्हिसा घेण्याची गरज नाही. त्यांना भीती वाटत आहे, त्यामुळेच ते अशी वक्तव्ये करत आहेत. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या आघाडीला उत्तर प्रदेशमध्ये मानहाणीकारक पराभव पत्करावा लागणार आहे, याचा त्यांना त्रास होत आहे.'

मोदी यांनी अलिकडेच वाराणसी येथे "रोड शो' केला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दरम्यान, काँग्रेसने या "रोड शो' टीका केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले, "प्रत्येक जण मंदिराज जात असतो. मात्र प्रचारादरम्यान वैयक्तिक लाभासाठी पंतप्रधानांनी मंदिरात जाणे शोभत नाही. उपासना आणि भक्तीचे राजकारण करणे हे त्यांना शोभत नाही.'

Web Title: PM doesn't have to take 'visas' from 'shehzadas' Akhilesh, Rahul to hold roadshow : BJP