नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या आफ्रीका दौऱ्यावर, भेट म्हणून देणार 200 गायी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या आफ्रीका दौऱ्यावर आहेत. यातील पहिल्या टप्प्यात मोदी आज सोमवार सकाळी  रवांडा येथे पोहचले आहेत. रवांडा नंतर  मोदी युगांडा आणि दक्षिण आफ्रीकेचा दौरा करणार आहेत. रवांडा आणि युगांडा देशाला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. 23 जुलै ते 27 जुलै असा पाच दिवसांचा मोदींचा हा दौरा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिपब्लिक ऑफ रवांडाचे अध्यक्ष पॉल कागामे यांच्यात द्विपक्षीय संवाद होणार आहे. संध्याकाळी आठ वाजता रवांडाचे अध्यक्ष आणि रवांडातील भारतीय राजदूत यांनी आयोजित केलेल्या डीनरवेळी दोन्ही देशातील करारांचे विनिमय होईल.

भेटीदरम्यान मोदी रवांडामधील 'गिरिंका' (एक कुटुंब एक गाय) या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. रवांडाचे अध्यक्ष पॉल कागामे यांच्या विशेष पुढाकाराने 'गिरिंका' (एक कुटुंब एक गाय) ही राष्ट्रीय सामाजिक संरक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या दौऱ्याच्या काळात भारताकडून 200 गायी रवांडा देशाला देण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही देशातील संबंध वाढण्यास मदत होणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 

या संपुर्ण दौऱ्यात सुरक्षाविषय, व्यापार, संस्कृती, कृषी, दुग्ध व्यवसाया संबंधी विविध करार करण्यात येणार आहेत. असेही परराष्ट्र मंत्रालयाने जाहिर केले आहे. 

चार वर्षात 56 देशांना भेटी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार वर्षात केलेल्या विदेश दौऱ्यात आतापर्यंत 54 देशांना भेटी दिल्या आहेत. आता यात आणखी दोन देशांची भर पडणार असून ही संख्या 56 होणार आहे. त्यांच्या चार वर्षातील कार्यकाळात 171 दिवस मोदींनी परदेशात घालवले आहेत. या दौऱ्यांमध्ये आतापर्यंत 1 हजार 484 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

Web Title: PM Five day visit to Africa, as a gift given by 200 cows