
Summary
हिमाचलमधील ८ लाख शेतकऱ्यांना १६० कोटींचा लाभ मिळाला.
पंजाबमधील ११ लाख शेतकऱ्यांना २२१ कोटींपेक्षा जास्त रक्कम दिली.
महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकरी केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवून आहेत.
केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता वेळेआधीच जारी केला आहे. हा प्रारंभिक हप्ता तीन राज्यांमधील २७ लाख शेतकऱ्यांसाठी जारी करण्यात आला आहे. हा किसान सन्मान निधी पूरग्रस्त उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी जारी करण्यात आला आहे, ज्यांना अलीकडेच भीषण पुराचा सामना करावा लागला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचेही केंद्राच्या मदतीकडे डोळे लागले आहेत.