How to check PM Kisan 25th installment status online
esakal
PM Kisan 25th Installment : देशभरातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत योजनेचे २४ हप्ते वितरित झाले असून, आता शेतकऱ्यांना २५ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.