
Farmers checking PM Kisan Samman Nidhi beneficiary status online for the 21st installment update.
esakal
Summary
पीएम-किसान योजनेचा २१ वा हप्ता दिवाळीपूर्वी येण्याची शक्यता आहे, पण अधिकृत घोषणा झालेली नाही.
जमीन १ फेब्रुवारी २०१९ नंतर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना किंवा कुटुंबातील एकाहून अधिक सदस्यांनी लाभ घेतल्यास हप्ता थांबू शकतो.
वडील आणि मुलगा यापैकी एकालाच पीएम-किसान योजनेचा लाभ मिळणार आहे, दोघांना नाही.
PM Kisan 21st Installment : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमधून शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळत आहेत. या योजनांमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना देखील समाविष्ट आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात ३ हप्त्यांमध्ये २-२ हजार रुपये जमा केले जातात. लवकरच या योजनेचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मात्र काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.