PM Kisan Scheme extended till 2031
esakal
नवी दिल्ली : शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देणाऱ्या ‘पीएम किसान योजने’ला २०३१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीसाठी ३.१५ लाख कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. यासोबतच समुद्रातील ऊर्जासाठे शोधण्यासाठी ८४,०८४ कोटी रुपयांच्या ‘समुद्र मंथन’ योजनेला मंजुरी देण्यात आली (Union Cabinet approves PM Kisan extension) असून ५,०७० कोटी रुपयांची ‘प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना’ आणि ३६,४४१ कोटी रुपयांच्या सुधारित ‘खेलो इंडिया’ योजनेलाही केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.