व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक Reliance Jio कडे; यावर्षी जोडले 9 कोटी सब्सक्राईबर्स

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 28 November 2020

टेलिकॉम रेगुलेटरी अॅथोरेटी ऑफ इंडिया (TRAI)ने ‘Yearly Performance Indicators of Indian Telecom Sector'नावाने वार्षिक रिपोर्ट जारी केला आहे.

नवी दिल्ली- Reliance Jio ने 2019 मध्ये 8.9 कोटी नवे वायरलेस सब्सक्राईबर्स जोडले आहेत. टेलिकॉम रेगुलेटरी अॅथोरेटी ऑफ इंडिया (TRAI)ने ‘Yearly Performance Indicators of Indian Telecom Sector'नावाने वार्षिक रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये टेलिकॉम प्रोवाईडर्सच्या इअर-ऑन-इअर सब्सक्राईबर्सच्या आकडेवारीची माहिती दिली आहे. 

रिपोर्टमधील माहितीनुसार, रिलायन्स जिओचे एकूण वायरलेस सब्सक्राईबर्स डिसेंबर 2018 (28 कोटी) च्या तुलनेत वाढून डिसेंबर 2019 मध्ये 37.0 कोटी झाले आहेत. या वाढीमुळे रिलायन्स जिओ 2019 च्या शेवटापर्यंत मार्केट लीडर झाली आहे.  

रिलायन्स जिओ 2019 मध्ये मोठी वाटचाल करत असताना दुसरीकडे व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल लाखो वायरलेस सब्सक्राईबर्स गमवत आहे. वोडाफोन-आयडियाने 2019 मध्ये 8.6 कोटी सब्सक्राईबर्स गमावले, तर एअरटेलने 1.29 कोटी सब्सक्राईबर्स गमावले. वोडाफोन-आयडिया सब्सक्राईबर्स 2018 मध्ये 41.87 कोटी होते, तेच आता डिसेंबर 2019 पर्यंत 33.26 कोटी झाले आहेत. कंपनीचा मार्केट शेअर घसरून 28.43 टक्के झाला आहे. 

खुशखबर! गुगल पे ट्रान्झेक्शनवर भारतीयांकडून चार्जेस नाही; फक्त 'या'...

एअरटेलनेही आपले ग्राहक गमावलेत, पण व्होडाफोन-आयडियाच्या तुलनेत कमी. कंपनीकडे 2018 मध्ये 34.02 कोटी सब्सक्राईबर्स होते, जे 2019 मध्ये 32.73 कोटी राहिले आहेत. एअरटेलचा मार्केट शेअर किंचितसा घसरुन 28.43 टक्के झाला आहे. 

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने मागील वर्षी 37 लाख नवे सब्सक्राईबर्स जोडले आहेत. डिसेंबर 2018 मध्ये बीएसएनएलचे 11.81 कोटी सब्सक्राईबर्स होते. बीएसएनएलचा मार्केट शेअर 10.26 टक्के आहे. 

ट्रायने खुलासा केलाय की, भारत टेलिकॉम सब्सक्राईबर्सची संख्या 2019 मध्ये वाढून 119.7 कोटी झाली आहे. डिसेंबर 2018 मध्ये संख्या 117.24  कोटी होती. 2019 मध्ये रिलायन्स जिओने जवळपास नवे 9 कोटी ग्राहक जोडले आहेत. रिलायन्स जिओ आणि बीएसएनएल शीवाय सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सनी आपले ग्राहक गमावले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vodafone idia Reliance Jio users increases by 9 crore