esakal | PM मोदींच्या हस्ते 'सरदारधाम भवन'चे उद्‌घाटन, विद्यार्थ्यांसाठी मिळणार अत्याधुनिक सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

PM मोदींच्या हस्ते 'सरदारधाम भवन'चे उद्‌घाटन

PM मोदींच्या हस्ते 'सरदारधाम भवन'चे उद्‌घाटन

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुजरातेतील अहमदाबाद शहरात उभारलेल्या सरदारधाम भवनाचे उद्‌घाटन केलं. त्याचप्रमाणे, मोदी यांनी ‘सरदारधाम भवन टप्पा २’ चे भूमिपूजनही केलं. सरदारधाम भवनामार्फत शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न केले जात आहेत. समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी तसेच युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचेही प्रयत्न आहेत. सरदारधाम भवनात विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल उपस्थित होते.

200 कोटी रुपयांचं सरदारधाम भवन -

PMO नुसार, सरदारधाम भवनाच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न केले जात आहेत. समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी तसेच युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचेही प्रयत्न आहेत. सरदारधाम भवनात विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सरदारधामच्या संकेतस्थळानुसार, 200 कोटी रुपयांचं काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झालं आहे. अहमदाबाद-गांधीनगरच्या सिमेवर भवन तयार झालं आहे. 11,672 चौ. फूटामध्ये सरदारधाम भवन तयार झालं आहे.

हेही वाचा: Sakianaka rape case : बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू

1.6 हजार विद्यार्थांना मिळणार फायदा -

अहमदाबाद येथील सरदारधाम भवनमध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध आहेत. कन्याछात्रालय मुलींसाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून देत आहे आहे. ही सुविधा कोणत्याही आर्थिक मापदंडाविना उपलब्ध आहे. येथे जवळपास 1.6 हजार विद्यार्थ्यांसाठी सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. एक हजार कंप्युटर सिस्टम, ई-लायब्रेरी, हाय-टेक क्लास रुम, जिम, ऑडिटोरियम, 50 लग्जरी खोल्यासोबत रेस्ट हाउस आणि इत सुविधा देण्यात आल्या आहेत.

एक हजार विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय -

सरदारधाम भवनामध्ये जवळपास एक हजार विद्यार्थांच्या क्षमतेचं ग्रंथालय तयार करण्यात आलं आहे. 450 जण बसतील इतकं मोठं ऑडिटोरियम, एक हजार विद्यार्थी बसतील असे दोन मल्टीपर्पज हॉल, इनडोर गेम आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सरदारधाम भवनासमोर 50 फूट उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

loading image
go to top