PM Modi Gold Purchase Appeal
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सोन्याच्या खरेदीचा मुद्दा उपस्थित करत देशवासीयांना आणखी एक वर्ष सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केलं आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे आयोजित कौशल दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या वर्षी केलेल्या आवाहनाची आठवण करून दिली. गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, असं आपण सांगितलं होतं. लोकांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे देशाचं परकीय चलन वाचण्यास मदत झाल्याचं त्यांनी सांगितलं.