#DelhiVoilence : अखेर पंतप्रधान मोदींनी सोडले मौन; म्हणाले, 'दिल्लीकरांनो...'

वृत्तसंस्था
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

दिल्लीतील परिस्थितीला गृहमंत्री अमित शाह जबाबदार असल्याचा आरोपही केला आहे. कॉंग्रेसने मोदी ऐवजी शहांना लक्ष्य केले आहे.

नवी दिल्ली : राजधानीतील हिंसाचारावरून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केल्यानंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्लीकरांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोदी यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, शांतता आणि सुसंवाद राखणे ही आपली जबाबदारी आहे. मी दिल्लीच्या माझ्या भावांना आणि बहिणींना आवाहन करतो की, त्यांनी कायम शांतता आणि बंधुता जपावी. दिल्ली शहर शांत राहावं आणि लवकरात लवकर पूर्वपदावर यावं हे जास्त महत्वाचं आहे. 

- Delhi Violence : दिल्ली हिंसाचारावर अजित डोवाल यांचे वक्तव्य; म्हणाले...

दिल्लीकरांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 

- दिल्लीत गुप्तचर विभागातील कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला गटारात

दिल्लीतील परिस्थितीवरुन आता राजकारणही सुरु झालं असून कॉंग्रेस आणि भाजपने पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. दिल्लीतील परिस्थितीला गृहमंत्री अमित शाह जबाबदार असल्याचा आरोपही केला आहे. कॉंग्रेसने मोदी ऐवजी शहांना लक्ष्य केले आहे. शहांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही काँग्रेसने लावून धरली आहे.

- सावरकरांच्या गौरव प्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला 'हा' निर्णय

दुसरीकडे, दिल्लीतील हिंसाचाराला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही मंगळवारी (ता.२५) रात्री उत्तर-पूर्व दिल्लीतील काही जागांची पाहणी केली आणि आढावा घेतला. हिंसाचार रोखण्याची प्रमुख जबाबदारी NSA वर सोपवण्यात आल्यामुळे डोवाल यांनी यामध्ये लक्ष्य घातले आहे. डोवाल यांनी अधिकाऱ्यांसह मौजपूर, जाफराबाद, गोकुळपुरी, भजनपुरा येथील घटनास्थळांची पाहणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi appeals for peace and brotherhood in Delhi