Video: सभा माझी पण हवा तुमची.. ! मोदींनी देखील केलं त्या दोघांचं कौतुक, यूपीतल्या रॅलीमध्ये काय घडलं?

Two children dressed up as Yogi and Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तर प्रदेशातील जोनपूरमधील सभेत एक वेगळा प्रसंग पाहायला मिळाला.
Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तर प्रदेशातील जोनपूरमधील सभेत एक वेगळा प्रसंग पाहायला मिळाला. दोन चिमुकल्यांची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घ्यावी लागली. दोन लहान मुलांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि स्वत: पंतप्रधान मोदींचा पेहराव केला होता. हे दृश्य पाहून पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही लहान मुलांचे कौतुक केलं. तसेच, सभा माझी आहे पण हवा तुमचीच आहे, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जोनपूरमधील सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांना दोन मुलं दिसली. या दोन लहान मुलांनी योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांच्यासारखे कपडे घातले होते. तसेच, हातवारे, हावभाव देखील त्यांच्यासारखे करत होते. हे पाहून मोदींनी आपलं भाषण थांबवलं अन् त्या दोन चिमुकल्यांची दखल घेतली.

Narendra Modi
Nashik PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाकरे-पवारांवर जोरदार टीकास्त्र; धर्मावर आधारित बजेटचा घाट

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'दोघे मोदी-योगी बनून आले आहेत. चांगलं काम केलंय तुम्ही. शाब्बास. सगळे मीडियावाले तुमच्याकडे लक्ष देत आहेत. खूप चांगलं मेकअप केला आहे. मोदी तर तर खूप सुंदर दिसत आहे. हातवारे देखील चांगले करत आहेत. ' पंतप्रधान मोदी यावेळी काहीवेळ त्या दोन मुलांकडेच पाहात राहिले. हा सगळा प्रसंग पाहून सभेतील उपस्थित लोकांनी देखील मुलांना दाद दिली.

Narendra Modi
PM Modi Road Show: "मोदी, भाजप अन् महायुतीला शोभतं का?" पंतप्रधानांच्या रोड शोमुळे , मुंबईकरांचा संताप

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर दौरा करत आहेत. मोदींनी सभांचा धडाका लावला आहे असं म्हटलं तरी चालेल. मोदी यांनी काल नाशिक आणि कल्याणमध्ये सभा घेतली. तसेच, घाटकोपर येथे त्यांनी रॅली झाली. १७ मे रोजी मोदींची शिवाजी पार्क येथे सभा होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील उपस्थित असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com