esakal | पद्मसाठी नावे सुचविण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

नरेंद्र मोदी

पद्मसाठी नावे सुचविण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

sakal_logo
By
नामदेव कुंभार

नवी दिल्ली - प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी सामाजिक क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्यांची नावे लोकांनी सुचवावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नागरी क्षेत्रात भारतरत्न नंतर सर्वाधिक प्रतिष्ठेचे असलेले पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पद्म पुरस्कार आहेत. कला, क्रीडा, सांस्कृतिक, समाजसेवा यासह वेगवेगळ्या क्षेत्रांतील भरीव कामगिरीसाठी ते दले जातात.

१९५४ पासून सुरू झालेल्या या पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनी केली जाते. पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेअंतर्गत वेगवेगळ्या घटकांकडून शिफारसही मागविली जाते. त्यापार्श्वभूमीवर मोदींनी या पुरस्कारासाठीच्या संकेतस्थळाचा दुवा दर्शविणारे ट्विट करून नावे सुचविण्यासाठी जनतेला साद घातली. त्यांनी म्हटले आहे, की देशात अनेक प्रतिभावंत लोक असून ते तळागाळात जाऊन असामान्य काम करत आहेत.

हेही वाचा: Video : भाजप कार्यकर्त्यांनी थोबाडीत मारल्याचा पोलिसाचा आरोप

बऱ्याचदा आपल्याला त्यांच्याबद्दल फारसे ऐकायला अथवा पाहायला मिळत नाही. अशा प्रेरणादायी व्यक्तींबद्दल तुम्हाला माहिती आहे का? पद्म पुरस्कारासाठी तुम्हाला १५ सप्टेंबरपर्यंत नाव सुचविता येईल. padmaawards.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नाव सुचवण्याचं आवाहन मोदी यांनी केलं आहे.

loading image