PM Modi Birthday : जेव्हा तीन मिनिटे उशिरा आल्याबद्दल मागितली होती माफी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून त्यांनी वयाच्या 74 वर्षामध्ये प्रवेश केला आहे.
PM Modi
PM ModiSakal

Happy Birthday PM Modi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून त्यांनी वयाच्या 74 वर्षामध्ये प्रवेश केला आहे. पीएम मोदींबद्दल असे म्हटले जाते की, ते वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात स्वतःला खूप शिस्तबद्ध ठेवतात. याची उदाहरणेही अनेक प्रसंगी पाहायला मिळाली आहेत. असाच एक किस्सा भाजप नेते कश्यप शुक्ला यांनी सांगितला आहे. ज्यामध्ये मोदींनी त्यांना तीन मिनिटे उशीर झाल्याबद्दल माफी मागितली होती.

PM Modi
PM Modi Birthday: मोंदींविषयी या गोष्टी माहिती आहेत का?

कश्यप म्हणाले की, एका कार्यक्रमात ते अवघ्या तीन मिनिटे उशिरा पोहोचले तेव्हा त्यांनी आयोजकांची आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांची माफी मागितली होती. ही गोष्ट 35-40 वर्षे जुनी आहे, जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातमध्ये पक्षाचे सरचिटणीस होते. मोदी संघटनेत कसे काम करायचे ते मी पाहिले आहे. हा किस्सा 1992 मधला आहे. गुजरातमधील राजकोटमध्ये पक्षाची बैठक पार पडली होती. यासाठी अनेकजण रात्रीच राजकोटमध्ये दाखल झाले होते. तर, मोदी सकळी लवकर अहमदाबाहून रस्तेमार्गाने राजकोटकडे रवाना झाले होते. त्यावेळी त्यांच्या मारूतीची छोटी गाडी होती. राजकोटला घेऊन जाण्याची जबाबदारी माझी होती.

PM Modi
PM Modi Lifestyle: 72 वर्षाच्या वयातही पीएम मोदी आहेत अगदी फिट; काय आहे त्यांचं फिटनेस सिक्रेट?

राजकोटला जात असताना मोदींनी मला विचारले की, आपल्याला बैठकीला जाण्यास उशीर तर होत नाहीये ना? त्यावेळी मी त्यांना सांगितले की, आपण ठरलेल्या नियोजनापेक्षा दहा मिनिटे पुढे आहोत. मात्र, आम्ही राजकोटला पोहोचेपर्यंत साधारण तीन मिनिटे उशीर झाला होता. ज्यावेळी बैठकीत मोदींची बोलण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम उपस्थित कार्यकर्त्यांची आणि आयोजकांची माफी मागितली. (Birthday)

नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. मोदी केवळ आठ वर्षांचे असताना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी ते पूर्ण RSS प्रचारक बनले. 19971 मध्ये ते पहिल्यांदा आरएसएसमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. लहानपणी वडनगर रेल्वे स्थानकावर चहा विकण्यातही मोदींनी वडिलांना मदत केली होती.

PM Modi
Narendra Modi : मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बालकांना मिळणार मोफत सोन्याची अंगठी

1995 मध्ये नरेंद्र मोदी यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाली आणि ते गुजरातहून दिल्लीत पोहोचले. त्यांनी हरियाणा आणि हिमाचल प्रदेश सारख्या राज्यांमध्ये भाजपच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले आहे. त्यांनी 7 ऑक्टोबर 2001 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नरेंद्र मोदी 12 वर्षे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर राहिले.

2014 मध्ये नरेंद्र मोदींनी भारताचे 14 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर 2019 मध्येही त्यांनी भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळवून दिला. मोदींबद्दल एक रंजक गोष्ट म्हणजे ते पहिल्यांदा आमदार झाल्यावर गुजरातचे मुख्यमंत्री झाले. तसेच ते पहिल्यांदा खासदार झाल्यावर भारताचे पंतप्रधान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com