
Prime Minister Narendra Modi speaks with Chief Justice D.Y. Chandrachud Gavai after a shocking courtroom incident where a lawyer attempted to throw a shoe.
esakal
Lawyer Attempts to Throw Shoe at Chief Justice Gavai News Update : सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्यावर आज सर्वोच्च न्यायालयातच हल्ल्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे. शिवाय, या घटनेचा सर्वचस्तरातून निषेधही व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेची दखल आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली असून, सरन्यायाधीश गवई यांच्याशी पंतप्रधानांचं फोनद्वारे बोलणंही झालं आहे.
याबाबत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली. मोदी म्हणाले, मी भारताचे सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्याशी बोललो आहे. आज सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात त्यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न हा प्रत्येक भारतीयास संताप आणणारा आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांसाठी कोणतीही जागा नाही, हे अतिशय लाजीरवाणं आहे.
पंतप्रधान मोदींनी एक्सद्वारे सांगितले की, अशा परिस्थितीत सरन्यायाधीश गवई यांनी दाखवलेली शांतता आणि संयमाचे मी कौतुक करतो. हे न्यायाची मूल्ये आणि आपल्या संविधानाच्या भावनेला मजबूत करण्यासाठीची असलेली त्यांची वचनबद्धता दर्शवते.
सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यासमोर न्यायालयात आज एका वकिलाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. आरोप आहे की, त्या वकिलाने सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकण्याचाही प्रयत्न केला. मात्र या प्रकारानंतर लगेचच घटनास्थळी हजर पोलिसांनी आरोपी वकिलास ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान सरन्यायाधीश गवई शांत होते आणि त्यांनी न्यायालयाचे कामकाज आधीप्रमाणेच सुरू ठेवले, त्यांनी एवढंच म्हटलं की मला अशा गोष्टींनी काहीही फरक पडत नाही.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई (सीजेआय) यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांना वकिली करण्यापासून तात्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. दिल्ली बार कौन्सिलने हा आदेश जारी केला आहे. कौन्सिलने वकील राकेश किशोर यांचा वकिली करण्याचा परवाना निलंबित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.