esakal | 'ऑक्सिजन'संदर्भात PM मोदींची उच्चस्तरिय बैठक; साठेबाजीवर कडक कारवाई करण्याचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

'ऑक्सिजन'संदर्भात PM मोदींची उच्चस्तरिय बैठक; साठेबाजीवर कडक कारवाई करण्याचे आदेश

'ऑक्सिजन'संदर्भात PM मोदींची उच्चस्तरिय बैठक; साठेबाजीवर कडक कारवाई करण्याचे आदेश

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भात आणि संपूर्ण देशात त्याचं वितरण करण्यासंदर्भात आज गुरुवारी एका उच्चस्तरिय बैठक आयोजित केली होती. अधिकाऱ्यांनी ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भात उचलली गेलल्या पावलांबाबत पंतप्रधान मोदींना माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत उत्पादन वाढवण्यासंदर्भात तसेच त्याच्या वितरण गतीने करण्यासंदर्भातील बाबींवर जोर दिला. पंतप्रधान मोदींनी हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी नवीन पद्धतींचा वापर करण्याचं आवाहन केलं. राज्यांना विनासायास ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा तसेच काही अडथळे आल्यास स्थानिक प्रशासनासोबत जबाबदारी वाटून दिली जावी. पुढे त्यांनी म्हटलं की, राज्य सरकारांनी ऑक्सिजनच्या साठेबाजीवर सक्त कारवाई करायला हवी.

हेही वाचा: इतर नेत्यांपेक्षा तो वेगळाच, हेमंत राहुल गांधीवर फिदा

हेही वाचा: एक कबूतर देशासाठी ठरतंय धोक्याचं; ऑस्ट्रेलिया सरकार ठार मारणार?

गेल्या काही दिवसात, लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता 3,300 MT/दिन वाढली आहे. खासगी आणि सरकारी प्लांट्स, उद्योग, ऑक्सिजन उत्पादक तसेच अनावश्यक उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मनाई करण्यातून ही वाढ झाली आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयकाडून देण्यात आली आहे. कॅबिनेट सेक्रेटरी, प्रिंसीपल सेक्रेटरी, होम सेक्रेटरी, आरोग्य सेक्रेटरी रस्ते आणि वाहतुक मंत्रायल, नीती आयोग आणि व्यापार मंत्रालयाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

loading image