Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

PM Modi Chintan Baithak: या बैठकीसाठी मंत्र्यांची प्रत्येकी ८-८ जणांच्या गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटाला स्वतःमधील सुधारणा, जनतेशी संवाद आणि प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता यांसारखे स्वतंत्र विषय देण्यात आले आहेत.
narendra modi

narendra modi

esakal

Updated on

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा अर्धा टप्पा जवळ येत असतानाच आता केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची चर्चा रंगू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांची एक मोठी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. २३ आणि २४ सप्टेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय 'चिंतन बैठक' आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ सहभागी होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com